spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

संतोष देशमुख हत्या खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्याची Sanjay Raut यांची मागणी

संतोष देशमुखांच्या हत्येने अनेक गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. बीडचा विषय हा महाराष्ट्रातील कायद्या सुव्यवस्था या संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, “संतोष देशमुखांच्या हत्येने अनेक गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. बीडचा विषय हा महाराष्ट्रातील कायद्या सुव्यवस्था या संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीडने अनेक खून पाहीले, अनेक खून पचविले. पण संतोष देशमुखच्या खुणानंतर जी वाचा फुटली त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला. सरकारला देखील हालचाल करावी लागली का ? सरकारला असे खून वाचवायचे सवय आहे. सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या त्यांचा वावर यामुळे अनेकांच्या मनात शंका येऊ शकतात. की खरोखर न्याय मिळेल का?”

फडणवीस म्हणतात की कोणालाही सोडणार नाही. पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला सोडलयं आणि कितीजणांना अडकवलय याचीच एक SIT नेमली पाहीजे. गेल्या काही काळामध्ये फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे. रक्ताचे डाग धूवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे आणि त्यांच्या आक्रोश किंकाळ्या दाबल्या आहेत. किती जणांना अडकविला आहे, याची SIT त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतः त्यांचे रिपोट घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राचे बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी. कराडला अटक केली पण हाच खटला बीडमध्ये चालवावा अशी मागणी संजय राऊतांनी केली.

पुढे राऊत म्हणाले की, “जसे शहाबुद्दीन केस आहेत ज्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात. हा खटला बाहेर चालला पाहिजे. आता पर्यंत बिल्ट क्लिंटन माहिती होतं, आता बीड क्लिंटन आलं आहेत. पहिले बिल्ट क्लिंटनचे प्रकरण येत होतं, आता बीड क्लिंटचे प्रकरण येत आहे. फडणवीस यांनी सत्य आणि न्यायची बाजू घेतली पाहिजे. आम्ही वाट पाहत होतो मुख्यमंत्री नेमकी कोणती पाऊल टाकत आहे. बीड संदर्भात एक अटक झाली, परभणी संदर्भात अनेक अटका व्हायच्या आहेत. शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या विषयासंदर्भात अगदी गंभीर आहेत ते सातत्याने संपर्क ठेवून आहेत राजकीय वळण त्याला मिळू नये. अनेक जणांनी राजकीय यात्रा केल्या खर आहे. मात्र शिवसेना त्यात नाही. तपासाला आता सुरुवात झालेली आहे तपासाला दिशा आणि गती मिळू द्या. आम्ही जे मयत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबांच्या दुःखामध्ये आम्ही सामील होऊ.”

हे ही वाचा:

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करणार का ?

भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! सिडनी कसोटीपूर्वी गोलंदाज जखमी तर संघात कोणाला मिळणार जागा ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss