spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात गोपनीय साक्षीदारान सगळं सांगितलं म्हणाला, भावा म्हणून हाक…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) ५ गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत. सीआयडीच्या तपासानुसार, या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचे उघड झाले आहे.तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे. हे देखील या जबाबामधून स्पष्ट करण्यात आले आहे.

Santosh Deshmukh Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) ५ गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत. सीआयडीच्या तपासानुसार, या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचे उघड झाले आहे.तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे. हे देखील या जबाबामधून स्पष्ट करण्यात आले आहे.

तिरंगा हॉटेलमध्ये जेवणावेळी हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले असून, या कटात विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांचाही सहभाग असल्याचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. (Santosh Deshmukh Case). ६ डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला होता. प्रतीक घुले (Pratik Ghule) व सुधीर सांगळे (Sudhir Sangle) हे सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) यास भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून बोलायचे तिघांची गावात व परिसरात मोठे दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराड (Walmik Karad) यांची सांगण्यावर खंडणी गोळा करायचे काम करत होते, असं एका गोपनीय साक्षीदाराने म्हटलं आहे.

आमचे गावात राहणारे सुदर्शन घुले, प्रतिक घुले व सुधीर सांगळे यांना मी ओळखतो. प्रतिक घुले हा रिक्षा चालवत असे तर सुधीर सांगळे याचे हॉटेल गंगमाऊली साखर कारखाना याठिकाणी होते. सुदर्शन घुले हा साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम करत असे. प्रतिक घुले व सुधीर सांगळे हे दोघे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते. ते त्याला भावा म्हणूनच बोलवायचे. तिघांची गावात व परिसरात मोठी दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराड याचे सांगण्यावरुन खंडणी गोळा करण्याचे काम करतात. माझा वरील जबाब संगणकावर टाईप करण्यात आला असून तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे. असा जबाब गोपनीय साक्षीदाराने दिला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसऱ्या एका गोपनीय साक्षीदाराने जबाबात म्हटलं की,वाल्मिक कराड यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्या आहे. याच टोळ्याच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो खंडणी नाही दिली. तर कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवितो. दहशतीमुळे वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही. वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले हे त्यांच्याच टोळीतील लोक होते.

दरम्यान, चाटे आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाचा प्रत्येक ‘शब्द’ आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी आहेच मात्र तो या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचेही उघड झाले आहे. तपासादरम्यान, पाच गोपनीय साक्षीदारांनी दिलेले जबाब समोर आले आहेत.

हे ही वाचा : 

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी कसा गेमचेंजर ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी

Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss