spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

संतोष देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशी बायकोला सांगितलं होत…; माहिती आली समोर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला तीन महिने झाले असून अद्याप एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. आज बुधवारी केज सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्या दिवशी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले आहे. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नीने नोंदवलेल्या जबाबातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील, असे संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला सांगितलं होते, अशी धक्कादायक माहिती दोषारोप पात्रातील अश्विनी देशमुख यांच्या जवाबात समोर आली आहे.

दिनांक 08 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चादेखील झाली होती. 7 आणि 8 डिसेंबरला काय घडलं होतं, याचा उल्लेख अश्विनी देशमुख यांनी त्यांचा जवाब दिलेला आहे. सीआयडीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी अश्विनी देशमुख यांचा जवाब घेतला आहे.

वाल्मिक कराडचा साथीदार विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांनी पत्नीला फोनवरील संभाषणाबाबत सांगितले होते. त्यामध्ये विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना म्हणाला की, ‘तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही’. या फोननंतर संतोष देशमुखांनी मला खूप टेन्शन आल्याचे पत्नीला म्हटले होते. त्यावर (पत्नी अश्विनी देशमुख) मी धीर दिला.. तूम्ही कोणाचे वाईट केले नाही. त्यामुळे तुमचे कोणी वाईट करणार नाही. उगाच काळजी करू नका. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, असे मी त्यांना सांगितल्याचे संतोष देशमुखांच्या पत्नीने जबाबात म्हटले आहे.

त्यांच्या डोक्यात काळजीचा भुंगा शिरला
विष्णू चाटे याचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख प्रचंड घाबरले होते. त्यांच्या डोक्यात काळजीचा भुंगा शिरला होता. पत्नीने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतोष देशमुख पत्नीला म्हणाले की, (संतोष देशमुख) तुला माहिती नाही, तो वाल्मीक कराड हा गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यासोबत उठबस आहे. तो आणि त्यांचे लोकं मला मारून टाकतील, असं शेवटचं प्रत्यक्ष संभाषण झालं होतं, असं संतोष देशमुखांच्या पत्नीने जबाबात म्हटले आहे.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss