spot_img
Sunday, January 12, 2025

Latest Posts

Santosh Deshmukh Murder Case : मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची मोठी अपडेट; CID घेणार दखल

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळताना दिसत आहे. याप्रकरणात २१ दिवस उलटून गेल्यानंतर वाल्मिक कराडने काल ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागात स्वतः सीआयडीसमोर शरणागती पत्करली. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर रात्री उशिरा त्याला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. १०० पेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पाडली. आता सीआयडी या प्रकरणाची दखल घेत प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडणार पुढे?

बीड जिल्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर वाल्मिक कराडने स्वतः सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा त्याला केज न्यायालयासमोर हजार करण्यात आले. तगड्या पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पाडली. या प्रकरणाची दखल घेत मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार असल्याची माहिती समोर आली असून सीआयडी याबाबतची योग्य दखल घेणार आहेत. दोघांमध्ये काय संबंध आहेत. घुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का? याचा छडा आता सीआयडी पोलीस लावणार आहेत. सुनावणीअंती कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सीआयडीचा रोख सुदर्शन घुलेच्या मागावर
मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खूनप्रकरणाला कलाटणीमिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २२ दिवसांपासून ते कुठे आहेत याचा कसून तपास करण्यात येत असून सीआयडी त्याच्या मागावर आहे. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss