बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत (Santosh Deshmukh Murder Case) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या (SIT) तपासात संतोष देशमुख हत्याबाबत मोठा पुरावा मिळाला असून या हत्येत कोणकोणती धारदार शस्त्रे वापरण्यात आली याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार करण्यात आले होते. या हत्येत आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून या प्रकाणाबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख प्रकरणात ‘ही’ शस्त्रे सापडली
संतोष देशमुख हत्येत एक गॅसचा पाईप तोही ४१ इंचाचा, त्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर कळया करदुडयाने गुंडाळून मूठ तयार केलेली तसेच एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाईप त्यात लोखंडी तारेचे ०५ क्लच वायर बसवलेले, अशी हत्यारे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींनी वापरले. त्याचबरोबर लाकडी दांडा, तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड व कोयता, लोखंडी फायटर, धारदारकत्ती यांचा हत्येसाठी वापर करण्यात आला. तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड व कोयता, लोखंडी फायटर, धारधारकत्ती हे हत्यारे सीआयडीच्या हाती अजून लागलेले नाही.
हे ही वाचा :
पुण्यात आढळले Guillain Barre Syndrome चे संशयित रुग्ण, काय आहेत लक्षणे? Pune
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी