Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून जोर धरत होती. अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मत मांडत आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितले जात होते. ते वर्णन ऐकून मन सून्न होत होते. अंगावर काटा ही येत होता. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अक्षरक्ष: अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत. सीआयडीने जे चार्जशिट दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावेळी हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत. याच व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आलाय.
या हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास १५ व्हिडीओ आणि ८ फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसतायत. संतोष देशमुखांना लोखंडी रॉडने मारहाण केली.कपडे काढून संतोष देशमुखांना जीव जाईपर्यंत मारले, त्यांचा व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तीनही प्रकरणे एकत्र करुन ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटले आहे. शिवाय या चार्जशीटमधले जे फोटो समोर आले आहेत त्यात वाल्मिक कराडसोबतचे संभाषणही नमूद करण्यात आले आहेत. या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला आहे. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो बघितल्यानंतर धनंजय देशमुखांना अश्रु अनावर झाले.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी