बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणनाने महाराष्ट्र हादरलंय. राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकरी आणि राजकीय नेते आंदोलन करत आहे. या प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देखमुख यांनी उच्च न्यायालयात खंडपीठात याचीका दाखल केली होती. परंतु त्यांनी मंगळवारी ही याचिका मागे घेतली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात टाकलेली याचिका मागे घेतली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावावा आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी याचिकेत केली होती. मात्र आता त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
धनंजय देशमुख यांनी त्यांच्या वकिला मार्फत याचिका मागे घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत याचिका मागे घेतली. धनंजय देशमुख यांनी त्यांचे वकील शोमित साळुंखे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, धनंजय देशमुख मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आमदार सुरेश धस यांनी ही भेट घडवून आणली आहे. या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांची उच्च न्यायालयात दाखल याचिका मागे घेतली आहे.
धनंजय देशमुख मुंबईसाठी रवाना
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 30 दिवस पूर्ण झाले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार आहेत.मुंबईत देशमुख कुटुंब मुख्यमंत्रयांचे भेट घेणार आहेत. ते अहिल्यानगरहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, आज मुख्यमंत्री यांना काही गोष्टी बोलायच्या आहे, त्यानंतर मी माध्यमांशी बोलणार आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?