spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

संतोष देशमुखच्या मुलीने व्यक्त केली मनातील इच्छा

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सर्व आरोपीना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व आरोप पोलीस कोठडी असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक गावात सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चा आणि आंदोलने केले जात आहेत. आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते.

या मोर्चात संतोष देशमुख यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना काय व्हायचं याबद्दल भाष्य केले. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आम्हला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, आम्ही मूक मोर्चा सहभागी झालो. आरोपीला ताब्यात घेणे गरजेचे आहे. तपासाचा भाग आहे, पण लवकरच आरोपी आणि मोबाईल ताब्यात घेतला पाहिजे, आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे. माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला, त्यासाठी जर आम्हाला बाहेर पडून न्याय मागावा लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही. आज आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, गावावर दुःख खूप मोठं आहे, त्या दुःखातून आम्ही बाहेर पडू की नाही माहित नाही. मात्र या दुःखाला थोडंसं मागे सारून न्यायापुढे पुढे जातोय. ही वेळ आमच्या कुटुंबावर आली ती दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये असे आम्हाला वाटते , असे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली.

पुढे वैभवी म्हणाली की, “मला डॉक्टर व्हायचं आहे. ते माझे स्वप्न आहे. माझ्या अभ्यासाचा विचार केला तर, माझं एक वर्ष बॅक लॉग झालं तर ते मी पुढच्या वर्षी करू शकते, पण अजून नायाच्या विषय आहे. माझ्या वडिलांचे बलिदान मला व्यर्थ जाऊ द्यायचे नाही, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या वडिलांच्या आधी, घटना किंवा दुसऱ्या प्रकारे ज्यांची हत्या झाली ते आवाज उठवू शकले नाही. आज आपण न्यायासाठी लढतोय, तर आपण सगळ्यांना न्याय देऊ असं मला वाटतं”, असे वैभवी देशमुखने म्हटले आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss