पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. सतीश वाघ यांची ९ डिसेंबरला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्यांचा मृत्यूदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. सतीश वाघ 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते.या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून,अवघ्या १५ मिनिटांमध्ये तब्बल 72 वेळा वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली होती. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली होती.
या प्रकरणी पोलिसांचा युद्धपातळीवर तपास सुरु होता. चार आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पोलीस तपासात सर्वात मोठा खुलासा समोर आला. त्यांच्याच पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं. आता अजून एक खुलासा तपासावेळी समोर आला आहे. सतीश वाघ यांचे अनैतिक संबध असल्याचे आणि छळवणुकीचे आरोप मोहिनी वाघ यांनी केले आहेत.
सतीश वाघ यांचेही बाहेर अनॆतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. हा सर्व त्रास असह्य होता, असा खुलासा मुख्य आरोपी मोहिनी वाघ हिने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. आरोपी अतिश जाधव याच्या धाराशिव येथील घरामध्ये त्याचे रक्ताने माखलेले कपडे सापडले आहेत. सतीश यांचा काटा काढण्यासाठी अक्षय जावळकरला पाच लाख रुपये कसे दिले, याबाबतच्या तपासासाठी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यात आली आहेत. आरोपींकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर अधिक तपास केला जात आहे. न्यायालयाने सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मोहिनीसह सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे.
आरोपी नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून हत्ये साठी वापरलेले हत्यार हे पेरणे फाटा येथे नदी पत्रामध्ये फेकून दिले असल्याचे आरोपींने सांगितले आहे. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून त्या हत्याराचा शोध घेण्यात येत. हत्यार सापडल्यास ते जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.