Thursday, April 25, 2024

Latest Posts

Scorpion Bite, अरे बापरे!, एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाने घेतला चावा

सध्या विमानामध्ये नेहमीच कोणत्याना कोणत्या घटना या होत आहेत. तसेच साप, उंदीर, ढेकणं आणि पक्षी देखील यापूर्वी विमानातन आढळून आले आहेत.

सध्या विमानामध्ये नेहमीच कोणत्याना कोणत्या घटना या होत आहेत. तसेच साप, उंदीर, ढेकणं आणि पक्षी देखील यापूर्वी विमानातन आढळून आले आहेत. तर कधी विमानात भांडण देखील झाले आहेत. आता अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. विमानात एका आता विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. विमानात विंचू चावल्याची ही पहिलीच घटना असावी.

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाला विंचवाने डंख मारला. दिनांक २३ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेची पुष्टी करताना एअर इंडियाने शनिवारी दिनांक ६ मे रोजी सांगितले की, प्रवाशावर उपचार करण्यात आले असून आता तो धोक्याबाहेर आहे. जेव्हा AI 630 विमान उड्डाण घेत होते तेव्हा त्याला विंचवाने चावा घेतला होता. क्रू मेंबर्सनी मुंबई एअरपोर्टला अलर्ट केले आणि महिलेला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एअरलाइन्सने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाला डॉक्टरांनी पाहिले होते आणि नंतर रुग्णालयात उपचारानंतर त्याला सोडण्यात आले. एअर इंडियाने सांगितले की, अधिकारी महिलेला डिस्चार्ज मिळेपर्यंत तिच्यासोबतच होते. विमानाच्या तांत्रिक पथकाने संपूर्ण तपास केला आहे. याबद्दल त्यांनी माफीही मागितली.

एअर इंडियाने सांगितले की, २३ एप्रिल २०२३ रोजी आमच्या फ्लाइट क्रमांक AI-630 वर, एका प्रवाशाला विंचू चावल्याची अत्यंत दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना घडली. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आणि विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर विंचू सापडला. यानंतर कीड नियंत्रणाची योग्य प्रक्रिया करण्यात आली.

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर एअर इंडियाने केटरिंग विभागाला लॉन्ड्री सेवा प्रदात्यांना काही प्रादुर्भाव आहे का ते तपासण्यासाठी आणि आवश्यक असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. याआधीही विमानात सरपटणारे प्राणी सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दुबई विमानतळावर उतरल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एक साप आढळला होता. तसेच गेल्या वर्षी जुलैमध्ये गल्फ-इंडिया फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये एक छोटा पक्षी आढळून आला होता. विमान लँड झाल्यानंतर पक्षाला विमानातून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss