मराठी भाषेला खूप जुना आणि मोठा वारसा लाभला आहे. त्याबरोबर ही भाषा तेवढीच थोर आणि मोठी आहे. मराठी भाषा फक्त लोकप्रिय नाही तर प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातही भाष्य वाढत गेली आहे. मराठी भाषेचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे, कारण ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि ऐतिहासिक वारसाची भाषा आहे. राज्यभरात दरवर्षी २७ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात ”मराठी राजभाषा दिन” (Marathi Bhasha Diwas) साजरा केला जातो. राज्य विधिमंडळाकडून या दिवसासाठी काही नियम निश्चित करून देण्यात आले आहेत. प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रीवरी रोजी जन्मदिन असतो. या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्ह्णून साजरा केला जातो.
मराठी भाषा प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. तिचा मूळ आविष्कार प्राकृत भाषांपासून झाला आहे. संत कबीर, तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र अनेक परभाषिक व्यक्तींना आपली मराठी भाषा ही खूपच आवडते. आपली भाषा आपल्या वेगवेगळ्या भाषेतील मित्रमैत्रिणींपर्यंत पोहचविण्यासाठी तुम्ही त्यांना ‘या’ खास शुभेछया पाठवा.
मराठी दिनाच्या शुभेच्छा :
- रुचवू मराठी, फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी भाषेच्या खूप शुभेच्छा - माझा शब्द,
माझे विचार,
माझा श्वास,
माझी स्फुर्ती,
माझे रक्त मराठी..
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! - लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! - मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! - माझ्या मराठी मातीचा लावा लहायस टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.