भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज ६ डिसेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण त्यांची आजारपणासोबतची सुरु असलेली झुंज अखेर आज संपली.
मधुकरराव पिचड हे अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून १९८० ते २००४ या काळात तब्बल ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले. ते मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी २०१९ मध्ये त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपसाठी अहोरात्र काम केले.
मधुकरराव पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्ह्णून राजकारणात सुरुवात झाली. त्यानंतर ते अनेक खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रडिंग काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता अथक प्रयत्न केले. ते आदिवासी बांधवाना रोजगार मिळावा यासाठी देखील नेहमी प्रयत्नशील राहिले. अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणाची निर्मिती मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाली. त्यांनी भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे नाव देण्यासाठी अनेकदा जन आंदोलन केले. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले. धरणाचं नामकरण नुकतंच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असे करण्यात आले आहे.
हे ही वाचा: