Shani Shingnapur Temple : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थित सुप्रसिद्ध देवस्थान शानिशांगणापुर हे कोणत्याना कोणत्या कारणामुळे कायमचं चर्चेत असतं, तसच आता हे देवस्थान शिळेवरच्या अभिषेखामुळे चर्चेत आलं आहे. शनिशिंगणापूरमध्ये येत्या 1 मार्चपासून बाजरी तेलाना शिळेवर अभिषेक करता येणार नाही. शिळेचा अभिषेक करण्यासाठी भाविकांना ब्रँडेड तेलाचाच वापर करावा लागणार आहे. हा ठराव समितीने मंजूर केला असून या ठरावाची सुरुवात १ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. भेसळीच्या तेलाने शिळेची झीज होत असल्याचं निदर्शनास आल्याने ती झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या प्रकारचं तेल तैलाभिषेकासाठी वापरता येईल?
भेसळीच्या तेलाने शिळेची झीज असल्यानं चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि हा निर्णय शनैश्वर देवस्थानने घेतला आहे. शनिशिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र तेलात भेसळ आढळल्यामुळे या तेलाचा स्वीकार केला जाणार नाही. भाविकांनी आणलेल्या तेलात शंका आढळल्यामुळे संस्थेने यावर बंदी आणली आहे.
शनी देवाची शिळा चौथऱ्यावर आहे. शानिशांगणापुरचे असे वैशिष्ट्य आहे कि इथे देव आहे पण देऊळ नाही. या देवस्थानाची अशी आख्यायिका आहे की इथे एका व्यापाऱ्याला नवस पूर्तीचा अनुभव आला आणि त्या व्यापाऱ्याने शिळेभोवती चौथरा बांधला. शनी देवाचे इथे वास्तव असल्याकारणाने शनी देवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान आणि ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
माझ्या घरात तलवारी असायच्या, सासऱ्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध – अभिनेत्री Janhavi Killekar
Chhaava Movie: ‘छावा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई !