Shanishinganapur Shani Temple : शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी. त्यांच्या या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे दुपारपर्यंत समजणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातूनच नाही तर परदेशातून येतात. शनिदेवावर अनेक जण तेलाचा अभिषेक करतात. येथे पूजा अर्चा करतात. त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून १ मार्चपासून सुरू झाली आहे. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. भेसळीच्या तेलाने शिळेची झीज होत असल्याचं निदर्शनास आल्याने ती झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे दुपारपर्यंत समजणार आहे.
भेसळीच्या तेलाने शिळेची झीज असल्यानं चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि हा निर्णय शनैश्वर देवस्थानने घेतला आहे. शनिशिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र तेलात भेसळ आढळल्यामुळे या तेलाचा स्वीकार केला जाणार नाही. भाविकांनी आणलेल्या तेलात शंका आढळल्यामुळे संस्थेने यावर बंदी आणली आहे. भविष्यात शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश आजपासून १ मार्चपासून लागू झाला आहे. मंदिराच्या ट्रस्टींनी याविषयीची माहिती दिली आहे. शिंगणापूर येथे शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अभिषेक करण्याची परंपरा आहे. भेसळयुक्त तेलाने अभिषेक होत असल्याने शनिदेवाची स्वयंभू मूर्ती खराब होत असल्याचे ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत अजून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला शनिदेवावर तेल अभिषेक करायचा असेल तर ते तेल तपासावे लागेल. जर भाविकांच्या तेलाबाबत ट्रस्टला संशय असेल तर तेलाभिषेक करता येणार नाही. अशा तेलाचा अभिषेक करता येणार नाही. असे तेल अगोदर भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. शनी शिंगणापूर देवस्थानने हा नियम १ मार्चपासून लागू होणार आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे.तर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली.
संपूर्ण देशात शनिदेवाचे अनेक मंदिर आहेत. त्यात तीन सर्वात जुने पीठ असल्याचे मानण्यात येते. त्यांचे अत्यंत महत्त्व आहे. त्यात शनि शिंगणापूर, शनिश्वर मंदिर ग्वाल्हेर आणि सिद्ध शनिदेव मंदिर, काशीवन, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या नवीन नियमानंतर आता तेल विकत घेताना भाविकांना काळजी घ्यावी लागणार आहे.तसेच मंदिराच्या बाहेरील दुकानदारांना देखील याबाबतीत आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक