spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Sharad Pawar: शरद पवारांचा बाबा आढावांच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाले, ‘निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर…’

महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन, त्याचबरोबर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या’.बाबांनी उपोषण सुरू केला होता. ते या आत्मक्लेश उपोषणाच्या माध्यामातून व्यक्त होत आहेत. तसेच लोकांच्या चर्चा होती. कालच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात, त्या ठिकाणी असे कुठेतरी ऐकायला मिळतं असं नाही. परंतु संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच हातात घेतली हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं, पण हे आता महाराष्ट्रात बघायला मिळालं. आता त्याचा परिणाम लोकांच्या अस्वस्थता वाढली आहे. लोकांच्यातली चर्चा आहे”, असंही शरद पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “आता कुणीतरी अशा प्रकारे पाऊल प्रभावी टाकण्याची आवश्यकता आहे. हा लोकांच्यातील चर्चेचा सूर आहे. आणि त्याच्यात अशी माहिती कळली डॉ. बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला, आणि ते स्वतः महात्मा फुले यांच्याशी संबंधित वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणाने सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्पष्ट दिसते. पण, त्यांनी आज राष्ट्रीय कर्तव्य आणि देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली. पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे काय सोयीचा नाही. त्यांनी एक प्रकारे जनतेचा उठाव या माध्यमातून केला आहे. संसदीय लोकशाही पद्धती ही उध्वस्त होईल असे चित्र आज या ठिकाणी दिसते. देशाची सूत्र आज ज्यांच्या हातात आहेत त्यांना याची काही पडलेली नाही इतकी चर्चा संबंध देशात आहे”, असं शरद पवार म्हणाले आहे.

“राज्यात आणि देशात सुरु असलेल्या प्रकाराबाबत संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहांमध्ये विविध पक्षांनी केला. तर त्यांना बोलून घायचं नाही. सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षांनी ते दोन्ही सभागृहामध्ये आमचं म्हणणं मांडायला संमती द्या, अशी मागणी करत आहेत. ती मागणी एकाही वेळेला सहा दिवसात मंजूर झालेली नाही. यामुळे सहा दिवासांमुळे एकदाही संमती मिळू शकली नाही. यांचा अर्थ देशाच्या संसदीय लोकशाहीवरती आघात ते करत आहेत, आणि यासाठी लोकांच्यात जावं लागेल. लोकांना जागृत करावे लागेल. लोक जागृत आहेत त्यांची उठाव केला पाहिजे. त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणांने स्पष्ट झालेलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि भल्या भल्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी आज या ठिकाणी दिसतात याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज जे प्रश्न उपस्थित झाले त्यांची नोंद आपल्याला घ्यावी लागेल”, असे शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss