काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे आज २१ डिसेंबरला मस्साजोग दौरा करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास १३ दिवस पूर्ण होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अजूनही फरार आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज मस्साजोग दौरा करणार आहेत. याचदरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणानंतर सर्वच स्तरावर त्याच तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या मुद्द्यावरून महायुती सरकारला परखड शब्दात जब विचारला. विरोधकांनी सातत्याने यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.
हे ही वाचा:
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक