spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

पालघरच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाच्या नेत्याची Sunil Tatkare यांच्यावर जहरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले (bharat gogawale) यांना लगावली होती. तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

Raigad guardian minister: राज्यात सध्या औरंगजेबावरून वातावरण चांगलाच तापलेलं आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा दावा अबू आझमी यांनी केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला व संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटली. अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला तसेच संपूर्ण अधिवेशापर्यंत त्यांचे निलंबन करण्यात आले. हा वाद ताजा असतानाच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने औरंगजेबाची उपमा देत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले (bharat gogawale) यांना लगावली होती. तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतोआणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे (Cricekt) उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना सुनावले.

पुढे बोलतांना, आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात. राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, असे थोरवे यांनी म्हटले. ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली. ‘आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय’, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.

याचवेळी बोलतान थोरवे यांनी नाव न घेता, अप्रत्यक्षपणे तटकरेंवर सडकून टीका करत त्यांची तुलना औरंगजेबाशी केली. यावेळी त्यांनी ‘छावा’ चित्रपटाचे उदाहरण देत टीकास्त्र सोडलं. ‘ छावा चित्रपट पाहिला आपण, त्यात औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं, अकलूज.. महाराष्ट्रातील अकलूजमध्ये येऊन, डेरा बांधून, फितुरीने त्याने छत्रपती संभाजी महाराजांना तिथे कैद केलं होतं. आणि आजचं अकलूज कुठे आहे ? सुतारवाडीला… आजचा औरंगजेब कुठे आहे ? सुतारवाडीमध्ये बसला आहे’ असं म्हणत त्यांनी तटकरेंवर निशाणा साधला. ‘चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल, यापुढे लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला रायगडमध्ये येऊन तिथली लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे. गद्दारी आमच्या रक्तात नाही, पण तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही समोरून वार करू ‘ असा इशारा थोरवे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. यावर आता सुनील तटकरे काय बोलतात हे पाहणे महत्वाचे आहे.

हे ही वाचा:

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार

Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss