spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Shiv Jayanti 2025 : बदलापूरात अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

Shiv Jayanti 2025 : हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, रणधुरंद, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण काल १८ फेब्रुवारी २०२५ रोजी बदलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

Shiv Jayanti 2025 : हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, रणधुरंद, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण काल १८ फेब्रुवारी २०२५ रोजी बदलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

 

बदलापूर शहराच्या पूर्वेतून निघालेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसले. त्याचबरोबर साहसी खेळ, पारंपरिक वेशातील मुले मुली, ढोलताशा पथक अशी हि भव्य मिरवणूक शहराच्या पूर्व भागातून उल्हास नदीपर्यंत नेण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स माध्यमावर पोस्ट शेयर करत असे म्हंटले आहे की, “निश्चयाचा महामेरु,बहुत जनांसी आधारु,अखंड स्थितीचा निर्धारु
।। श्रीमंतयोगी।।”
स्वातंत्र्यपूर्व काळात लिकमान्य टिळकांनी जातीय सलोख्यासाठी शिवजयंती आणि गणेशउत्सव सुरु केला. बदलापुरात याला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला. तर बदलापुरात १९२० पासून म्हणजे स्वतंत्र काळापासून शिवजयंती आणि गणेशउत्सव साजरा केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरही याच बदलापुरात आहे, एकेकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही येथील शिवजयंतीसाठी हजेरी लावली होती, असा इतिहास आहे. त्याचबरोबर बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचा दावा अनेकदा केला जातो असे इतिहास करांचे म्हणणे आहे.

Latest Posts

Don't Miss