अनेकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. साईभक्तांसाठी संस्थांमार्फत मोफत जेवण दिले जाते. मात्र,त्यामुळे महाराष्ट्रातील भिकारी तिथे गोळा होतात, असे आक्षेपार्ह्य वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. या विधानामुळे पिता-पुत्रांमध्येदेखील वेगळी भूमिका पाहायला मिळत आहे. साई भक्तांसाठी मोफत जेवण सुरूच राहील,असे मंत्री राधे विखे पाटील यांनी सांगितले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया वरून जाहीर पत्रं लिहिले आहे.
अनेक भक्तजण तासंतास रांगेत उभे राहून श्रद्धा व सबुरीने अन्नप्रसाद म्हणून ग्रहण करत असतात. ईथे उभे असलेले भाविक भक्त हे फक्त गरीब किंवा मध्यम वर्गीयच नसून धनाढ्य लोकही असतात. मोठ्या भक्तिभावाने ते तासंतास रांगेत उभे राहून अन्नप्रसाद ग्रहण करतात. मात्र,भक्तांनाच भिकारी म्हणणे हा उन्मत्तपणा बरा नव्हे, असा खरखरीत शब्दांत सुजय विखे पाटील यांना टोला लावला आहे. सुजयजी आपल्या विधानाच्या समर्थनार्थ हे पैसे शिक्षणासाठी वापरले जावेत,असे म्हणत आहेत. मात्र ,सुजयजी आपले पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेचे, प्रवरा शिक्षण संस्था, अभियांत्रिकी यांसारखे विविध ठिकाणी सुरु केलेले शाळा,कॉलेज यांतील कोणत्या युनिटमध्ये मोफत शिकवता?
अगदी चौथी पाचवीच्या मुलांना सुद्धा आपल्या प्रत्येक युनिटमध्ये एक ते दीड लाख रुपये शुल्क आकारले जाते. परंतु, त्याच निवासी शाळांमधून भोजनालय किंवा सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लोकांना पाच ते सात हजार रुपयांवर राबवून घेतले जाते तेव्हा आपला हा उदात्त समाजकार्याचा दृष्टिकोन कुठे जातो?. खरंच, गरजू गरीब मुलांना शिक्षण मिळावे आणि मोफत मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावे सुरू असणाऱ्या आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या या अनेक युनिट्स मधून मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी तुम्हीच पुढाकार का घेत नाही ? असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी विखे पाटलांना केला आहे.
हे ही वाचा:
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सापडल्या सारख्या नंबर प्लेटच्या दोन गाड्या…
‘मराठवाडयाच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार’ माजी मंत्री Rajesh Tope यांची भूमिका