Udhav Thackeray-Eknath Shinde Shivsena : शिवसेनेत आता नवीन वाद विकोपाला पेटला आहे. गेल्या काही आठवड्यापासून उद्धव ठाकरे गटातून मोठ्या बातम्या समोर येत आहेत. खासदार,आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अजून त्यातच मुंबईत शाखा कोणाची? या नवीन वादाला सुरुवात झाली आहे. वर्सोवा शाखेवरून उद्धव सेना आणि शिंदे गटात धुमशान सुरू आहे. वर्सोवा शाखेवरून मोठा तणाव वाढला आहे.
राजूल पटेल यांचा उद्धव ठाकरे गटाला रामराम
अंधेरी वर्सोवामधील कट्टर शिवसैनिक नेत्या राजुल पटेल यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत पक्ष सोडला आहे. राजुल पटेल यांचा वर्सोवा परिसरात मोठा दबदबा आहे. महिला संघटना हा त्यांचा हातखंडा आहे. विधानसभा निवडणुकीपासूनच त्या उद्धव सेना सोडतील अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी आता कायमचा मातोश्रीला रामराम ठोकला आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी तीन वेळा नगरसेविका म्हणून पद टिकवत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
राजूल पटेल यांनी शाखेला ठोकले टाळे
शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करताना उद्धव गटाच्या शिवसेना शाखेला टाळे लावले आहे. राजूल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याआधी शाखेला टाळे लावत त्या शाखेची चावी स्वतःकडे ठेवल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले आणि यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून शाखेत प्रवेश केला आहे. त्यावेळी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांसोबत स्वतः अनिल परब शाखेबाहेर उभे होते.
राजूल पटेल यांनी केले वक्तव्य
राजूल पटेल म्हणाल्या, माझा पक्षाशी दीर्घकाळ संबंध असूनही, त्यांच्या मूळ पक्षातील नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. “मी UBT पक्षाच्या विरोधात नाही किंवा त्याबद्दल असमाधानीही नाही. पण, पक्षातील स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे मी वैतागले आहे.” पटेल यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी, त्या सर्व घटनांना वैतागल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis