मुंबईमध्ये टॅक्सी युनियनच्या (Mumbai Taxi Mens Union) नेत्यांकडून यंत्रणांना टॅक्सीच्या भाड्यामध्ये चार रुपयांची वाढ करण्याची विनंती केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे आता एका किलोमीटरसाठी किमान 32 रुपये आकारण्यात येत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची (Mumbai Taxi Mens Union) मागणी मान्य झाल्यामुळे रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढून ते 26 रुपये इतके तर टॅक्सीचे भाडे 28 रुपयांवरून 32 रुपये इतके करण्यात आले आहे. आता झालेल्या भाडेवाढीवरून राजकारण तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. भाडेवाढीवरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बसस्थानकात आंदोलन केले.
जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकातील गेटसमोर आज २७ जानेवारीला चक्काजमा आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाने १५% भाडेवाढ केली आहे. त्याविरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने बस स्थानकावर आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्य शासनाने गोरगरीब जनतेवर लादलेल्या आर्थिक भुर्दंडीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, परिवहन मंत्र्याचा धिक्कार असो, परिवहन मंत्री हाय.. हाय.. अशा जोरदार घोषणा देत सदरील निर्णय तातडीने रद्द करण्याची यावेळी शासनाकडे मागणी करण्यात आली. ही दरवाढ रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार आहोत, हे सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला.
एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजेत. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? असा सवाल काँग्रेस ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना दरवाढीचा विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खातं चालवते कोण? असा सवाल विचारत काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अधिकारी जर खाते चालवतात तर हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत-जंमत सुरू आहे. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. यासोबतच, अंगलट आलं की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगलं काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
हे ही वाचा :
पुण्यात भोर महाड मार्गावर वरंध घाटात भीषण अपघात, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी
ST भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची काँग्रेस ज्येष्ठ नेते Vijay Wadettiwar यांची मागणी