Sunday, December 3, 2023

Latest Posts

लातूरमधील धक्कादायक घटना उघडकीस, मागणी मान्य होईपर्यंत तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय

संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापला होता. यातच आता एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.

संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापला होता. यातच आता एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी त्यांचं उपोषण गुरुवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थगित करण्याआधीच लातूरमधील (Latur) तरुणाने त्याचं आयुष्य संपवलं. त्यानंतर त्याचा मृतदेह हा उपोषण स्थळी ठेवण्यात आलाय. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्णय या तरुणांच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान गोविंद देशमुख यांनी आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ५० टक्के च्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बोरगाव काळे येथील गोविंद मधुकर देशमुख त्यांचं आयुष्य संपवलं. आज पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची बाब त्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांना लक्षात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धावपळ करत गोविंद यांचा मृतदेह उपोषण स्थळी आणण्यात आला. आज त्यांचा मृतदेह बोरगाव काळे येथील उपोषण स्थळी ठेवण्यात आलाय. आजूबाजूच्या अनेक गावातील मराठा आंदोलन यावेळी हजर होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी त्यांनी ७२ तासांचे उपोषण केले होते. पण गुरुवार (2 नोव्हेंबर) रोजी त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. दरम्यान सायंकाळी ५ वाजता त्यांनी त्यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. तसेच आत्महत्याग्रस्त युवकाच्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी देखील केली गेलीये. या आंदोलकांची भूमिका लक्षात घेता प्रशासनाकडून देखील तात्काळ धावपळ करण्यात आली. तसेच या उपोषणस्थळी तहसीलदारांना पाठवण्यात आले. यावर चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. आजूबाजूच्या गावातील अनेक लोक यावेळी उपोषण स्थळी हजर आहेत. मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील महिला वर्ग देखील उपोषण स्थळी उपस्थित आहे. त्यामुळे यावर प्रशासन कोणता मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

SHRIKANT SHINDE: व्हीआयपी कल्चर नकोय, रस्ता बंद करण्याचा आम्हाला अधिकार नाही

आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर, २०२३, इतरांना दुखावू नका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss