Friday, June 2, 2023

Latest Posts

धक्कादायक बातमी! महाराष्ट्रात ३५०० हजार मुली बेपत्ता

महाराष्ट्रामध्ये मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये झालेल्या बेपत्ता मुलींची संख्या ही फार चिंताजनक आहे.

महाराष्ट्रामध्ये मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये झालेल्या बेपत्ता मुलींची संख्या ही फार चिंताजनक आहे. राज्य महिला आयोग वाढणाऱ्या बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येमुळे आता सतर्क झाले आहे. महाराष्ट्र राज्यांमध्ये गेल्या तीन महिन्यापासून जवळपास ३५०० पेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या आहेत. असे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून दिसून आले आहे. परंतु याचं नेमकं कारण काय आहे महिला आयोगाच्या याबाबतीची मागणी काय आहे राज्य सरकारची भूमिका काय या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दिवसेंदिवस महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे, मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढते, याबाबतीत महिला आयोगासमोर अहवाल उपाय योजना सादर करा अशा सूचना दिल्या जात आहेत. आयोग कार्यालयांमध्ये याबाबतीत आज सुनावणी पार पडली यासंदर्भामध्ये अहवाल जरी सादर केला असला तरी यंत्रणा सक्षम नाही हे माझे मत आहे अशी भूमिका रूपाली चाकणकर यांनी माध्यमांसमोर मांडली आहे.

बेपत्ता झालेला मुलींना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिलांना नोकरीच्या अमिश दाखवून नेले जात आहे. नंतर त्यांचे कागदपत्र आणि मोबाईल काढले जात आहेत. तपास सुरू आहे महिलांना शोधण्यामध्ये यश मिळेल अशी मला खात्री आहे. हरवलेला महिलांची संख्या पाहता राज्यांमधून दुबई आणि ओमानमध्ये महिलांची तस्करी होत आहे असा दावा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. पुढे रूपाली चाकणकर म्हणाल्या पोलिसांसमोरही ताण पाहता नव्या यंत्रणेने या प्रकरणावर काम करावे अशी त्यांची मागणी आहे. दहा पेक्षा जास्त संख्या असलेल्या ठिकाणी महिलांसाठी समिती असल्या पाहिजेत २५% महिलांचा विचार करता ही यंत्रणा सक्षम वाटत नाही असे रूपाली चाकणकर म्हणाला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समिती असावी कागदावरच नाही तर प्रत्यक्षामध्ये महिलांसाठी विशेष यंत्रणा कार्यरत असावी अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी शासनाकडे केली आहे. गव्हर्नमेंट करून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही महिला आणि बालविकास मंत्र्यांकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे परंतु बेपत्ता महिलांसाठी ही समिती होती त्यामध्ये एकाही पोलिसाची नियुक्ती झाली नाही जर यातच पोलीस नसतील तर महिलांचा शोध लावणार कोण असावा रूपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss