अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी फरार होता. पण आता त्याला अटक करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला अखेर पोलिसांनी पकडलं आहे. कल्याण पोलिसांची सहापथकं त्याच्या मार्गावर होती. शेगाव येथून पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं. विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण कल्याणला हादरवून सोडलं आहे. लोकांच्या मनात या घटनेवरुवन प्रचंड रोष आहे. परवा संध्याकाळी कल्याण कोळसाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला.
अल्पवयीन मुलीच अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी फरार होता. पण आता विशाल गवळीला अटक झाली आहे. मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. विशाल गवळी अत्यंत खतरनाक गुंड आहे. त्याच्यावर कल्याण पूर्वेत विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय बलात्कार, पॉक्सो सारख्या गुन्हयांमधील हा आरोपी तडीपार होता.
मुलीच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण आहे. राजकीय पक्ष आणि स्थनिक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. बदलापूर घटनेच्या पार्शवभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. राजकीय पक्ष व स्थानिक नागरिकांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आज पहाटेपासून कल्याण कोळसेवाडी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला. चौकाचौकात मोठा बंदोबस्त लावला.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule