राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत दोन वर्षांचा करावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा कोकाटे बंधूंना सुनावली होती. त्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला होता, तर हस्तक्षेप याचिकेमुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यता असतानाच जिल्हा सत्र न्यायालयाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील त्रुटी दाखवत त्या खारीज केल्या. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगिती देण्यात आली.
कोकाटे यांच्या विरोधात अंजली राठोड, शरद शिंदे आणि झुंजार आव्हाड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या. माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेचा अंतिम निकाल येईपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती असणार आहे. याबाबत हस्तक्षेप याचिका दाखल करणारे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक कोर्टाचा निर्णय येताच माणिकराव कोकाटे यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सीमंतिनी कोकाटे म्हणाले,”माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाले त्या दिवसापासून तर विरोधात निकाल गेल्यापर्यंत माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करत होते. कृषिमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे अतिशय चांगलं काम करत होते, मात्र या निकालामुळे आम्हाला काही प्रमाणात साईट बॅक मिळाला होता. आज मेहरबान न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला पुढच्या काळात देखील साहेब चांगले काम शेतकऱ्यांसाठी करतील.”
पुढे त्या म्हणाल्या,” यासंदर्भात आमचे वकील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. शेतकऱ्यांसाठी आमच्या विचारांमध्ये काही योजना आहेत त्यासाठी आम्हालाही एक नवी संधी मिळाली. विरोधात आलेले याची काही या संदर्भात मेहरबान कोर्टाने ऐकून घेतला आणि त्यानंतर हा निर्णय दिलेला आहे. विरोधकांकडून राजीनामाची मागणी होत होती तो काळ आमच्यासाठी कठीण होता. कृषिमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात हे सर्व घडलं हे आमच्यासाठी अनपेक्षित होत. हे सर्व असताना मेहरबान कोर्टाने दिलेला निकाल आमच्यासाठी आनंदाचा आहे दिलासादायक आहे,” असं म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी