गेल्या महिन्याभरापासून राज्यातील जनतेला प्रश्न पडतोय तो म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली? या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे? या घटनेचा तपास करण्यासाठी ज्या एसआयटी देण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या माहितीत अनेक खुलासे केले आहेत. वारंवार अवादा कंपनीकडे आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होते, पण कंपनीने दिली नाही. त्यावेळी संतोष देशमुख हेच प्रमुख अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली ते एसआयटीने न्यायालयात म्हटले आहे. एसआयटीने आज नायायालयात ७ दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. संतोष देशमुख या खंडणीला अडथळे ठरत होते म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
एसआयटीने कोर्टात केलेले ७ दावे कोणते आहेत?
- २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑक्टोबर महिन्यात सुदर्शन घुले याने सदर कंपनीचे काम बंद पडले होते.
- ९ डिसेंबर २०२४ला सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला.
- अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलावून आरोपी वाल्मिक कराड दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती.
- २९ नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटे याच्या फोनवरून सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती.
- आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी पुन्हा अवादा कंपनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण , शिवीगाळ व धमकी दिली होती.
- त्यादिवशी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी विरोध केल्यावरून ९ डिसेंबर २०२४ ला खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला आहे.
- वरील सर्व घटना होत असतानाच्या काळात आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरून दिसून येत आहे.
या गुन्ह्यातील आरोपींनी कट करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे. आरोपींपैकी एका आरोपी ला अटक होणे बाकी असून तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मिक कराड यांनी काही मदत केली आहे का? आता याबाबत तपास करणे बाकी आहे.
हे ही वाचा :
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .