Thursday, November 30, 2023

Latest Posts

काही लोकांच्या पोटात दुखते, एकनाथ शिंदेंचा टोला

अहमदनगर येथील शिर्डीच्या साई मंदिरात साईचरणी नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले. यावेळी पद्य पूजन आणि साई दर्शन घेऊन आरती संपन्न झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे उदघाटन देखील करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस हे देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी ज्या कामाचे उद्घाटन करतात, तो प्रकल्प वायू वेगाने पुढे जाऊन पूर्ण होत असतो. अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचा परीस असून, हात लावताच सोनं होते. त्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपूजनासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी बोलावत असतो. पण मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते, पण त्यांच्याकडे आम्हाला काही बघायचं नाही. अशा पोट दुखणाऱ्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी विनामूल्य उपचार देण्यात येतात, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

शिर्डी येथे आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी प्रधानमंत्री यांचे आज दुपारी भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. तेथून हेलिकॉप्टरने साई संस्थानच्या हेलिपॅड येथे आगमन झाल्यावर प्रधानमंत्री मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. राज्यात आमचं सरकार येण्यापूर्वी अडीच वर्षे महाराष्ट्रातील विकासकामे बंद होती. परंतु, आमचे सरकार येताच आम्ही त्याला चालना दिली आणि नवीन प्रकल्प देखील सुरु केले. राज्याचा विकास करण्यासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता असते. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ज्याकाही गोष्टी आपण मागितल्या, त्यांनी त्या सर्वकाही देण्याचं काम केले, असेही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

वनिता खरातने दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोवर, हेमांगी कवीची मजेशीर कमेंट

पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसेस अडवून परत पाठवल्या – आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss