परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी, समितीही नेमण्यात आली आहे आणि घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी होत आहे. मात्र सूर्यवंशी कुटुंबियांची न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढाई सुरु आहे. आज परभणी ते मुंबई लॉंग मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची जाहीर केलेली मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा ही मदत नाकारली. जोपर्यंत दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नाही असं सोमनाथच्या आईने स्पष्ट केले. त्यामुळे, मदतीचा चेक घेऊन आलेल्या उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार आदि पथकाने 10 लाख रुपयांचा चेक घेऊन परतावे लागले.
पोलीस न्यायालय कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. तसेच सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांना वाढीव मदत देण्यात यावी, यासह अनेक मागण्या घेऊन आज परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आंबेडकरी अनुयायांकडून काढण्यात आला. परभणीतील धरणे आंदोलन स्थळापासून हा लाँग मार्च आज दुपारी 1 वाजता मुंबईकडे रवाना झाला आहे. दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे या लाँग मार्चचे नेतृत्व करणार आहेत. आजचा पहिला मुक्काम हा टाकळी कुंभकर्ण येथे असणार आहे.
1 महिन्यात चौकशी करुन दोषींना शिक्षा द्या
अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई यातील दोषी पोलिसांवर करण्यात आलेली नाही सरकारने जी समिती नेमलेली आहे ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीश अचलिया यांची नियुक्ती केलेली आहे, त्याला तीन ते सहा महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र, ही बाब आम्हाला मान्य नसून एका महिन्यात चौकशी करून या दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केलेली आहे. तसेच आजच्या लाँग मार्चमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. परंतु, आईची तब्येत ठीक नसल्याने पुढे जाऊ शकू की नाही याचा विचार करू असे सोमनाथचा भाऊ प्रेमानंद यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .