Sunday, November 26, 2023

Latest Posts

आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग

मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे

मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमलेल्या समितीकडून राज्य सरकारकडून माहिती मागवण्यात आलीये. या समितीने आतापर्यंत काय काम केले याचा अहवाल उपसमितीला सादर करावा लागेल.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात अत्यंत ज्वलंत झालाय. त्यामुळे राज्य सरकारच्या हालचाली देखील वेगानं सुरु आहेत. त्यातच मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण पुकारलंय. म्हणून राज्य सरकारच्या अडचणी देखील जास्त वाढल्यात. त्यातच मराठा आरक्षण देणारच असा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक जास्त तीव्र होते गेले.

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
ना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावं, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल अशा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे रविवारपासून राज्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं असून आता यापुढे अन्न, पाणीच काय तर उपचारही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

गावागावात साखळी उपोषण सुरू करा
ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करावं आणि इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या आंदोलनाच्या दरम्यान जर कुणाला काही झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा : 

आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)

संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss