spot_img
spot_img

Latest Posts

राज्यभरातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता…

राज्यभरातील एसटी (ST Worker) कर्मचाऱ्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लालपरीची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

राज्यभरातील एसटी (ST Worker) कर्मचाऱ्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लालपरीची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दुपारी १२ वाजता कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवलं आहे. एसटी कामगारांचे काही आर्थिक आणि महत्वाचे प्रश्न अजून सुटले नाही आहेत म्हणून त्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidana) ते उपोषणासाठी बसणार आहेत असा इशारा त्यांनी दिला आहे. उदय सामंत यांच्याशी चर्चा करून जर मार्ग निघाला नाही तर ते १३ सप्टेंबर पासून बेमुदत संप करणार आहेत असा इशारा देण्यात आला आहे. महागाई भत्ता ४२ टक्के करावा, महामंडळाला अर्थसहाय्य करावे, कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा कामगार संघटनेच्या मागण्या आहेत.

याआधी २०२१ मध्ये राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी ५४ दिवस संप केला होता. ५४ दिवसाचा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले . परंतु आता गणपतीच्या वेळी एसटी कामगार संघटना आजपासून संपावर जात आहे. जाणून घेऊयात काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या.

महाराष्ट्र कामगार एसटी कर्मचार्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह द्यावा. २०१८ पासून सुरु असलेल्या महागाईची थकबाकी द्यावी. २०१६ एप्रिल ते २०२१ ऑक्टोबरची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी. माहे एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्या. मूळ वेतनात जाहीर केलेल्या रु.५०००, रु.४००० आणि रु.२५०० रुपयांमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करा
राप कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांएवढे वेतन मिळण्यासाठी १० वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा.
सन२०१६ -२०२० च्या एकतर्फी जाहीर केलेल्या रु.४८४९ /- कोटींमधील शिल्लक रक्कम त्वरीत द्या.
गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या. शिस्त आणि अपील कार्यपद्धतीचा भंग करुन देण्यात येणाऱ्या नियम बाह्य शिक्षा रद्द करा.अपहार प्रवण बदल्या रद्द करा.सण अग्रीम रु. १२५०० मूळ वेतनाची अट न लावता द्या. आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून टाका आणि स्वमालकीच्या लालपरी घ्या. चालक-वाहक वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.१० ते १२ वर्षांपासून TTS वर असलेल्या कर्मचाऱ्यांना TS वर घ्या. सेवा निवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दुर करा. कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्वप्रकारच्या एसटी बसेसमध्ये फरक न भरता मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये द्या. सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसह एक वर्षाचा फरक न भरता मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये द्यावा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा तात्काळ द्या.

Latest Posts

Don't Miss