spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

‘विविध प्रमाणपत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ’, Chandrashekhar Bawankule यांचा निर्णय

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा देणारा मोठा दिलासा देणारा एका अर्थाने क्रांतिकारी निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केला.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा देणारा मोठा दिलासा देणारा एका अर्थाने क्रांतिकारी निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केला. आता यापुढे जात पडताळणी प्रमाणपत्र असो वा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट किंवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे विशेषतः दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विविध कोर्सेस ना वा कॉलेजमध्ये प्रवेश घेताना जो उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र व अन्य प्रमाणपत्रांसाठी होणारा ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च वाचणार तर आहेच पण यापुढे अर्जदारांना फक्त एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self Attested) अर्ज लिहून तहसील कार्यालयातून आवश्यक प्रमाणपत्र मिळू शकेल.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून हा निर्णय लागू झाल्यामुळे सर्वसामान्य त्यातही प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक बचत होणार आहे. कारण आता कोणतेही प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत सुलभता येणार आहे.त्यामूळे सर्वच स्तरातून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

हे ही वाचा:

‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं

Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss