मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत आणि पुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १३ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सर्वच ठिकाणी सभांचा धुरळा उडाला आहे. तसेच प्रचार तोफांचा झंझावात सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत.
भुसावळ मतदार संघात वंचितचे उमेदवार जगन सोनवणे यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथील नेहरू मैदानात वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सुजाता आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. तसेच निवडणूक आल्या की विचित्र-विचित्र प्राणी आपल्या घरी येऊन पाकीट, मटन, बाटलीच्या राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्याला पाकीट, मटन बाटलीचं राजकारण बंद करून वंचितांच्या हक्कांचे राजकारण उभे करण्याची वेळ आली असून आपल्या हक्काचा व विचारांचा आमदार निवडून द्यायचा आहे असे मत भुसावळच्या सभेत आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसा घडामोडींचा वेगही वाढत वाढतोय. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रचारसभा घेत त्यांचे मत व्यक्त केले.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर