spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

चक्क सरकारी योजनेत Sunny Leone चे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये

छत्तीसगडच्या सरकारी योजनेत चक्क सनी लिओनीचे नाव आढळून आल्याने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे ती एका सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजना’ (Mahatari Vandan Yojana) या योजनेची ती लाभार्थी असून तिला दर महिना पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. त्यामुळे सनी लिओनीची जोरदार चर्चा रंगली आहे.

छत्तीसगड सरकारी योजनेत सनी लिओनीचा नावाचे एक ऑनलाईन खाते उघडण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांना ‘महतरी वंदन’ या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिना १००० रुपये पाठवले जात होते. या योजनेची घोषणा सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीरनाम्यात केली होती. आता बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.

महतरी योजनयेच्या वेवसाईड तपासणी दरम्यान फाईलमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव सनी लिओन आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरमधील अंगणवाडी कडून आणि दुसऱ्या एका सुपरवायजर कडून याची तपासणी करण्यात आली असून यामध्ये लाभार्थ्याला मार्च आणि डिसेंबरचा हप्ता मिळाल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.

बस्तरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली त्याबाबात त्यांनी या प्रकरणाची तपासणी करत याचं उत्तर दिले. बस्तरच्या वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडून जर काही तक्रार देण्यात आली तर नक्कीच याबाबत कारवाई केली जाईल. अशी माहिती दिली जाईल.

सरकारने राज्यातील ७० लाख महिलांना या महतरी योजनेचा दहावा हप्ता ४ डिसेंबर रोजी एकूण ६५२.०४ कोटी रुपये जारी केले आहेत. महिलांच्या बँक खात्यांवर ५,००० कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे. पहिला हप्ता १० मार्च रोजी पीएम मोदींच्या हस्ते जारी करण्यात आला होता. सध्या ७० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss