खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बीडमधील घटना आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरूनही भाष्य केलं. बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात धनजंय मुंडेंना सहआरोपी करा, अशी मागणी देखील खासदार सुळे यांनी केली असून वाल्मिक कराडचे पीए धनंजय मुंडे यांना भेटायला गेले आहेत, यावरून कळतं की हे किती नाते घट्ट आहे. त्यामुळे त्यांना देखील सहआरोपी करा अशी आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. दरम्यान, यापूर्वीच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिल्याची माहिती एक्सवर पोस्ट केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत अनेक प्रतिक्रिया येत होत्या. अशात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (४ मार्च) रोजी यावर प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे म्हणत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. ८४ दिवस त्यांना नैतिकता सुचली नाही. सुरेश धस म्हणतात ते खरेच आहे, नैतिकता आणि यांची कधी गाठचं झाली नाही. धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेटलेच नाहीत”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये जे खून झाले आहेत, त्यांची फाईल पुन्हा उघडली पाहिजे, अशी मागणी मी कालच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध केला आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा ‘न’ पण वापरला नाही, त्यांच्या पक्षात काय चाललं आहे, हे त्यांनाच माहीत असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले होते, त्यावरुन सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केलाय. पण पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची माफी मागितली आहे, त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला असे म्हणत पंकजा मुंडेंच्या भूमिकेचं स्वागत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश