राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणूक झाल्यांनतर पहिल्यांदाच बीड जिल्याचा दौऱ्यावर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सतत करण्यात येत आहे. सुरेश धस यांचा साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. खुंटेफळ तलावामुळे 30 गावांतील तब्बल 80 हजार एकर ओलिताखाली येणार आहे. 2800 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आमदार सुरेश धस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ पार पडला . या प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील 30 गावांतील 25 हजार 543 हेक्टर क्षेत्र म्हणजे 80 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
तिसऱ्या वेळी आमदार असताना आमदार सुरेश धस यांनी 500 एमसीएफटी पाणी कुकडी प्रकल्पातून मेहेकरीच्या प्रकल्पात आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे हे काम मार्गी लागले होते. 2005 पासून आमदार धस हे उजनी धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून पाइपलाइनने खुंटेफळ साठवण तलावात आणण्यासाठी त्यांचा संकल्प होता. यासंदर्भात बोलताना सुरेश धस यांनी म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्रिपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आष्टी मतदारसंघात जाहीर कार्यक्रमासाठी येत असून आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त भागात निश्चितच हरितक्रांती घडेल, अशा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.
ऐतिहासिक क्षण
आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी आष्टी तालुका शिरूर, पाटोदा येथे व्यापाऱ्यांकडून उत्स्फुर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. खुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे व या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. हा ऐतिहासिक आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आष्टी येथील व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फुर्त बंद ठेऊन कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?