गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. तब्बल १९ दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला. या मुद्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झाला. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आणि यातच आता रविवारपासून वाल्मिकी कराड हा पोलिसांना शरण येणार असल्याच्या बातम्या येत आहे. तसेच त्याला आज पुण्यात अटक झाल्याची अफवाही पसरली होती. यासर्व प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, जोपर्यंत सीआयडीकडून कन्फर्म माहिती येत नाही. तोपर्यंत आका आत गेले की नाही ते सांगणार नाही. सध्या आका आणि त्याचा मोठा आका यांच्या द्वंद्व सुरु आहे. हजर व्हावे की होऊ नये, असे हे द्वंद आहे. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना (Pankaja munde) टोला लगावला, तर धनंजय मुडेंसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.
बीड हत्याप्रकरणात बडा नेता कोण हे मला माहिती नाही. पण, यातले आका १०१ टक्के, मी सुरुवातीपासून सांगतोय. व्हिडिओ कॉलवर दाखवून संतोष देशमुख यांना क्रूरतेने मारलं आहे. मग, तो ३०२ चा आरोपी झालाच. पण, सध्या आकावर खंडणीचाच गुन्हा दाखल आहे, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरता. फक्त देवाच्या कृपने किंवा मी प्रार्थना करतो फक्त आकाचे आका त्यात सापडू नयेत, असे म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंबद्दल भूमिका व्यक्त केली. मला वाटतं ते नाही सापडणार, कारण आकांना फोन घेऊन कुणाला-कोणत्या भाषेत बोलायचं ही त्यांची स्टाईल मला चांगलीच माहिती आहे, असेही धस यांनी म्हटलं.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका