Suresh Dhas on Pankaja Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टीचे आमदारच एकमेकांसमोर आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस आणि भाजपाच्याच मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी मी राष्ट्रीय नेत्या असताना माझ्यावर सुरेश धस आरोप करतात, यामुळे आपण त्यांची तक्रार करणार असल्याचे म्हटले. पंकजा यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना धसांवर टीकास्त्र सोडले आहे. धस यांनी थेट लेखी तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर यावर पंकजा मुंडेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुरेश धस यांनी पंकजा मुंडें धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत काहीही भाष्य केलं नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. त्याला उत्तर देताना सुरेश धस यांनी पक्षाचा उमदेवार सोडून दुसऱ्याचा प्रचार राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे त्यांची लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले.
सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दावाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास गेले, हे खरे आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
आमदार सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हे भाजपचा बुथ प्रमुख आहेत. त्यामुळे हे प्रकरण मी तापवले आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही? तोपर्यंत हे प्रकरण तेवत ठेवणार आहे. पंकजाताई म्हणतात, मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत, आम्ही पण भाजपचे आहोत ना. विधानसभेत त्यांची एकच जागा होती, असे त्या जाहीरपणे म्हणत होत्या. पंकजा ताईंचे आष्टी मतदार संघात कमळ चिन्ह नव्हते, त्यांचे शिट्टी हे चिन्ह होते. आमच्याकडे पंकजा मुंडे यांच्या विचारांचा माणूस आष्टीमधून निवडून आला नाही, मी भाजपचा व्यक्ती म्हणून निवडून आलो आहे. हे त्यांचे दु:ख आहे. भाजप उमेदवार ऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे मी पंकजा मुंडे यांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे लेखी स्वरुपात करणार आहे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. मला समज देण्याचे कारण काय? मी पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केला नाही. त्यांनी आष्टीत कमळाचा प्रचार सोडून शिटीचा प्रचार केला. त्या बीडमध्ये माझी एकच जागा आहे, असे म्हणत होत्या. ते व्हिडिओ तुमच्याकडे आहे, असे धस यांनी सांगितले. सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दावाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास गेले, हे खरे आहे.
अजय मुंडेंनी केलेल्या विधानासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धस यांनी, “अजय मुंडे हा लहान आहे. माझ्या लेकरासारखा आहे. धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलायला लाऊ नये स्वतः बोलावे,” असं म्हटलं आहे. “आष्टी मतदारंघात पंकजा मुंडे यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. आतापर्यंत मी वरिष्ठांकडे तक्रार केली नव्हती आता मात्र लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे,” असं धस म्हणाले. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार का हे पहावं लागणार आहे.
पंकजा मुंडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यास गेल्या नाही. त्या विषयावर काहीच बोलल्या नाही. धनंजय देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाले तेव्हा पंकजा मुंडे बोलल्या नाही. पद गेल्यावर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यास उशीर झाला, असे म्हटले. आम्ही मात्र आधीपासून बोलत होतो. त्यांना या पदावरुन हटवावे, अशी मागणी करत होते. गुन्हेगारी आमच्याकडे नाही. राख परळी, वाळू परळी, सर्व गुन्हे परळीत आहे, असे धस यांनी म्हटले.
हे ही वाचा :
Follow Us