काल वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानतंर त्याच्या विरोधात कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यांनी टायर पेटवून भर दुपारी मकरसंक्रांतीच्या दिवशी परळी बंद करण्यात आली. आणि मंगळवारी त्यांनी परळी बंद ठेवली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस म्हणाले की, एखादा आरोपी जर गुन्ह्यात सापडला, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला तर त्याच्यासाठी शहर बंद ठेवायचं, आरडाओरडा करायचा हा आता नवीन परली पॅटर्न झाला आहे. हा जातीयवाद नाही तर हा चार पाच टक्के लोकांचा गुंडवाद आहे. कोणत्याही गुन्हेगाराला ताब्यात घेतलं तर शहर बंद करायचं, दुकानं बंद ठेवायची हा नवीन परळी पॅटर्न आहे. पण यामुळे व्यापाऱ्यांचंच नुकसान होणार आहे. हे त्यांना समजत नाही.
पुढे, आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरही उत्तर दिलं. आपल्यावर कुणीही काही बोलू नये. उगाच काहीतरी बोलून फोकस बदलायचा नाही. राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा असं धस म्हणाले. तसेच या प्रकरणात आता आकाला मकोका लागला आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आकाच्या वरची माणसेही लवकरच सापडणार आहेत. तसेच या केसमध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही अजून बाकी आहे, असं सुरेश धस म्हणाले.
दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबरच्या दिवशी दुपारी ३:२० ते ३:३० वाजण्याच्या दरम्यान या तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद एसआयटीकडून करण्यात आला. तसेच देशमुखांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने देशमुखांना धमकी दिली होती असा दावा एसआयटीने केला आहे. वाल्मिक कराडला केज नगर पंचायतीनं पुन्हा एक दणका दिला आहे. वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र केज नगरपंचायचीने रद्द केलं आहे. केजमधील वाईन शॉपला बेकायदेशीररित्या प्रमाणपत्र दिल्याचा आरोप स्थानिक खासदार बजरंग सोनावणेंनी केला होता. त्यानंतर नगर पंचायतीकडून प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
Walmik Karad यांच्यावर मकोका कायदा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी