भाजप आमदार सुरेश धस यांनी आज प्रसार माध्यमांशी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केले. सरपंच हत्या प्रकरणातील आका हे वाल्मिक कराड आहेत. तर आकाचे आका हे धनंजय मुंडे हे आहेत, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं. “कुठेही विचारलं, ४५ एकर जमीन वाल्मिक कराडची आहे. अमूकतमूक ठिकाणी ५० एकर, बार्शी तालुक्यात ४५ ते ५० एकर, आता मांजरसुंबा म्हणून गाव आहे तिथे ४५ एकर दुसऱ्या पत्नीच्या नावावर जमीन आहे. तुमच्या जमिनी कुठे-कुठे आहेत?”, असा दावा सुरेश धस यांनी केला.पुण्यात मगरपट्टा सिटी तिथे शेजारी नवीन इमारत आहे. तिथे ड्रायव्हरच्या नावावर आख्खा मजलाच बुक केला आहे. हे पैसे कुणाचे आहेत? धनंजय मुंडे यांचे पैसे नाहीत तर कुणाचे आहेत? आमच्या इकडे बऱ्याच प्रॉपर्टीमध्ये जैन मल्टिस्टेटची चौकशी सुरु आहे. त्यात बहुतांश प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिक कराड यांची नावे संयुक्तपणे आहेत. मी तशी एसीबीमध्ये सुद्धा चौकशी करणार आहे”, असं सुरेश धस यांनी सांगितलं.
“अदाणी आणि अंबानी सुद्धा वापरत नसतील तेवढे मोबाईल ते वापरत आहेत. मी अंबानी यांना विचारायला जाणार आहे की, तुम्ही किती मोबाईल वापरता? किंवा नीता ताईंना जावून विचारतो. अंबानी यांचे कुणी पीए असतील, आता रतन टाटा यांच्या चिरंजीवांना जावून नतमस्तक होवून विचारतो की, तुम्ही किती मोबाईल वापरता? कारण आमचे वाल्मिक आण्णा १७ मोबाईल वापरतात. त्यांचे १०० बँक अकाउंट सापडले आहेत. त्या अकाउंटमध्ये १००० कोटी पक्षा जास्त पैसे असतील”, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली आहे ती अतिशय चुकीची आहे. आपल्या मराठी भाषेच्या शब्दकोशात जितक्या वाईटात वाईट शब्द असेल त्या पद्धतीने ही हत्या झाली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे आका आणि आकाचे आका, हे दोघेही एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले आहेत की वाल्मिक आणि धनंजय मुंडे वेगळे करताच येणार नाहीत. त्यामुळे आजपर्यंत मी म्हणत होतो, पण ज्या माहिती येत आहेत, १४ जूनला आणि २९ जूनला कुठे बैठक झाली, संतोषच्या हत्येची सुरुवात जून महिन्यात झाली. त्याच्या प्रमुख बैठकीला धनंजय मुंडे होते. धनंजय मुंडे यांचा सातपुडा हा शासकीय बंगला आहे. मी काल स्टेटमेंट केलं, शासकीय बंगल्यात ही बैठक झाली. हे सगळं तुमचं साम्राज्य वाल्मिक कराडने उभे केलं ते गेल्या ५ वर्षातलं आहे”, असं सुरेश धस म्हणाले.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?