बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळत आहे. आता या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातील दोघांना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस यांना टोलाही लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की,” हे प्रकरण पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्यायप्रविष्ठ आहे. ज्यावेळी आम्हाला वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालत नाही त्यावेळी हे प्रश्न आम्हाला विचारायला पाहिजे. पोलिसांच्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे पोलिसांच्या कारवाईवर बाधा येईल असे काही करू नये. हे प्रकरण योग्य दिशेला न्यायचं असेल तर तपास सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांना फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा बीडमधील दहशदवाद बंदुकीच राज्य मोडून काढायच आहे.”
“भूमिका मांडणे, राजकारण करणं यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं हे महत्त्वाचं, मोर्चाला जाणार तिथे जाऊन पत्रकार परिषदा घ्यायला या गोष्टी टाळल्या पाहिजेत. परभणीतील सूर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या हत्या दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उद्धव ठाकरे हे लवकरच त्यांना भेटतील ते राजकारण करण्यासाठी नाही. आम्ही फक्त वाट पाहत आहोत, पोलीस नेमकी काय कारवाई करत आहेत. आम्ही संपूर्ण अटका झाल्या की त्यांच्या सांत्वनाला जाऊ, राजकारणासाठी जाणार नाही”,असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
nitesh rane देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल, मोठा निर्णय घेत म्हणाले…
‘पुष्पा 2’ स्क्रिनिंग चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; जामीन मंजूर