Wednesday, November 29, 2023

Latest Posts

बीडमध्ये उद्योजक सुरेश कुटे भाजपात प्रवेश करणार?

उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड (Beed) जिल्ह्याचं नावलौकिक केलं. आता कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे (Suresh Kute) हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड (Beed) जिल्ह्याचं नावलौकिक केलं. आता कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे (Suresh Kute) हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दिवाळीनंतर सुरेश कुटे यांचा हे भाजपमध्ये (BJP) अमित शहा (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश होणार आहे. दिल्लीत (Delhi) हा प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात भाजपचं बळ आणखी वाढणार आहे.

‘द कुटे ग्रुप’मुळे जिल्ह्याचाही लौकिक झाला, तसेच हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. महिलांसाठी त्यांनी पत्नी आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं त्यांच्या समूहात खास नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे. दिवाळीनंतर सुरेश कुटे हे भाजपमध्ये (BJP) अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. दिल्लीत त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे.

कुटे उद्योग समूहाने (The Kute Group) अल्पावधीमध्ये मोठी झेप उद्योग क्षेत्रात घेतलेली आहे. तिरूमला (Tirumalla) हा तेलाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड कुटे उद्योग समूहानं तयार केलेला आहे. कापड दुकान ते १९ कंपन्यांचा १७ हजार कोटी रुपयांचं असेट असलेला ‘द कुटे ग्रुप’चे चेअरमन सुरेश कुटे महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांमध्ये समाविष्ट असलेलं मोठं नाव. तसं पाहायला गेलं तर सुरेश कुटे राजकारणापासून लांबच राहणं पसंत करत होते. पण अचानक त्यांनी घेतलेल्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांमध्ये गणले जाणारे ‘द कुटे ग्रुप’चे चेअरमन सुरेश कुटे यांचाही समावेश होतो. काही दिवसांपूर्वी बीडमधील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागानं धाड टाकली होती. तिरुमला उद्योग समूह महाराष्ट्रातील खाद्यतेल आणि पेंड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तिरुमला उद्योग समूहाच्या 5 शहरांतील कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली होती. तेव्हापासून कुटे समूहाची चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. अशातच आता कुटे समुहाचे सर्वेसर्वा राजकारणात प्रवेश करत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss