spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Sushma Andhare : मातोश्रीवर नेहमी पडीक असलेल्या नीलम गोऱ्हेच्या गाड्यांपासून साड्यांपर्यंत सर्वच बाहेर काढत सुषमा अंधारेंनी दिल प्रतिउत्तर

नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्यांना प्रत्युत्तर दिलंय. नीलम गोऱ्हे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं..? एखादी कादंबरी, त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ, ललित लेखन, कवितासंग्रह, किंवा एखादा चारोळी संग्रह... त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली...?? असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय.

Sushma Andhare : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मोठा खळबळजनक आरोप ठाकरेंच्या शिवसेनेवर केला आहे. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी मराठी साहित्य संमेलनांत केले आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले. 2 मर्सिडिज घेऊन पक्षात प्रवेश दिला जायचा असे निलम गोऱ्हे म्हणाल्या. यानंतर ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते अंबादास दानवे या सर्वांनीच नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलंय. त्यात आता शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही निलम गोऱ्हेंना आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय.

नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्यांना प्रत्युत्तर दिलंय. नीलम गोऱ्हे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं..? एखादी कादंबरी, त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ, ललित लेखन, कवितासंग्रह, किंवा एखादा चारोळी संग्रह… त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली…?? असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय. साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांना बोलावले ही साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकता ही झाली आहे. शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही नामी संधी असते. त्यामुळे शासकीय खर्चाने होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची संधी सोडतील त्या नीलम गोऱ्हे कसल्या…, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपावरती बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, दोन मर्सिडीज? अरे बापरे मला असं वाटतंय की नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षात खूप काळ राहिलेले आहेत. मला आत्ता काय दोन अडीच वर्षे झाली आहेत. जवळपास 30 वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढली आहेत आणि जर त्या म्हणत आहेत. त्यात जर तथ्य असेल तर मला प्रश्न पडला आहे, की नीलम गोऱ्हे यांनी किती कमावलं असेल. कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकू द्यायच्या नाहीत. तीस वर्ष त्याच मातोश्रीवर असल्यासारख्या असायच्या. त्यामुळे सर्व नेमणुकांचे अधिकार हे नीलम गोऱ्हे यांची सही किंवा नीलम गोरे यांनी सांगितल्यावरच ते सामनामध्ये जायचं. तर निश्चितपणे ही सगळी कामाई नीलम गोऱ्हे यांच्याकडे जात असेल त्यांना याबाबत विचारलं पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदा, महापालिका, निवडणुकांमध्ये नीलम गोरे यांचे भाजपची आर्थिक हितसंबंध कशा पद्धतीने जुळायचे आणि इथली शिवसेना त्यांनी कशी बापट सेना करून ठेवली. पुण्यातले बिल्डर व्यापारी यांच्याकडे कलेक्शनला जाणारी माणसं यावर पुण्यातले शिवसैनिक अत्यंत चवीने चर्चा करतात, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. या सगळ्यावर सुषमा अंधारेनीं भाष्य केले.

अशा नीलम गोऱ्हेंचं नाव घेतलं की मी फार प्रयत्न करते त्यांची एखादी गाजलेली सभा आठवण्याचा. ज्या सभेत त्यांनी अत्यंत घनाघाती भाषण केला असेल. किंवा एखाद प्रचंड मोठा आंदोलन जे आंदोलनात त्यांनी लाट्या काठ्या खाल्या असतील. एखादा मोठा भ्रष्टाचार जो त्यांनी प्राणपणाने लढून बाहेर काढला असेल तर मला असं काहीच आठवत नाही. नीलम गोरे हे नाव उच्चारलं की मला आठवतात.. त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या.. हिरे मोती माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस, त्याच्यावर तसेच कानातले डूल… साडीला मॅचिंग अशी महागडी ऐटदार पर्स.. तीन-चार मोबाईल, दोन-तीन पीए.. कुणाच्या हातात मोबाईल कोणाच्या हातात डायरी तर कुणाच्या हातात मॅडम साठी दोन-चार हातरुमालाच्या घड्या असतात, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

हडपसरच्या डिस्पेन्सरीला प्रॅक्टिससाठी नीलम गोऱ्हे पीएमटीने अर्थात सिटी बसने जा ये करायच्या, असे आज एका माजी आमदाराने फोन करून सांगितल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. पीएमटीने फिरणाऱ्या नीलम गोरे यांच्याकडे आता महागड्या गाड्या आल्या. नीलम गोरे यांचे उद्योगधंदे कोणते माहित आहेत का? मला माहित नाहीत.एवढी आर्थिक सुबत्ता आली कशी? नीलम गोरे तुम्ही अजून कमवा आणि मखलाशा करून अजून पद मिळवा. पंजा पक्षाने तुमचं कर्तृत्व नसताना तुम्हाला मोठं केलंय त्यांच्यावर बोलताना जरा तारतम्य बाळगा. इतकं खोटं लोकांना पचत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss