बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप करत असलेले आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे त्यांची भेट झाल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. एका खाजगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे त्यांची ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. ३-४ दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती आहे. सुरेश धस यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात टार्गेट केले आहे. मात्र आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक राजकीय नेते या गुप्त भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार धसांवर ‘गंगाधर ही शक्तिमान’ म्हणत टीकेची झोड उठवली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सातत्याने बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडे चार तास भेटले की साडे चार मिनिटे भेटले हा महत्त्वाचा मुद्दा नाहीये, मुद्दा हा आहे या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करुचं कसं शकतात, कधी ते नाशिकला जातात तर सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात पोलीसांना माफ करा सांगतात, तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात, ही संधिग्द्ता ते का निर्माण करत आहेत ?
पुढे ते म्हणाल्या की,”या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत, आणि ते नुसता स्वत:वरचा विश्वास गमावत नाहीयेत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता यामुळे संपुष्टात येत आह. आता आम्हाला असं वाटत आहे की धस यांनी जो लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त या निमित्ताने जी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मुळे आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मोठा नेता म्हणून समोर जाणं आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांची इमेज बाहुबळी म्हणून स्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं. ते काम त्यांचं ते झाल आहे, त्यामुळे आता आपण कोणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि गेलो काय याने काय फरक पडतोय असं त्यांना वाटत असावं.”
“मला संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत जास्त वाईट वाटतं आहे. ज्यांनी एवढा विश्वास सुरेश धस यांच्यावर टाकला. बीडच्या अठरा पगडजातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला तो आज त्यांनी मातीमोल ठरवला आहे. आज आम्हाला खेदाने म्हणावं लागतंय की गंगाधर ही शक्तीमान आहे”, असे अंधारे यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा:
‘माझी लाईन पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा’ उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची उबाठावर टीका
दे धक्का ! नाशिकमध्ये मनसेला पुन्हा एकदा खिंडार पडणार