spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांसमोर मोठा दावा; म्हणाला, मी मोबाईल…

स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात एका २६ वर्षीय तरुणीचा बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला तपासासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक काल शुक्रवारी (दि. ७) गुनाट गावी घेऊन गेले. पोलिसांनी आरोपीच्या लपलेल्या ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्याच्या घराची देखील झडती घेण्यात आली त्यावेळी सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे सुमारे अर्धा ते पाऊण तास स्वारगेट बस स्थानक परिसरातच फिरत होता. पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता आरोपी परिसरात निर्धास्तपणे फिरताना स्पष्टपणे आढळून आला. पोलिसांनी शोध मोहीम राबवून संपूर्ण शेत धुंडाळला मात्र, गाडेचा मोबाईल मिळाला नाही.

आरोपी दत्तात्रय गाडे बलात्कार केल्यानंतर तो फरार होऊन गुनाट गावातील शेतात तीन दिवस लपून बसला होता. पोलिसांना गाडेने शेतातच मोबाईल फेकल्याचा संशय आहे. त्यातून महत्वाचे पुरावे मिळू शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या लपण्याच्या ठिकाणी शोधमोहीम राबवली.

मोबाईल अपघाताने पडला असल्याचा दावा
शुक्रवारी सकाळी वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 45 जणांचे पथक गुनाट गावी पोहोचले. प्राथमिक तपासात गाडेने शेतात मोबाईल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आरोपीचा दावा आहे की मोबाईल त्याने फेकला नसून खिशातून अपघाताने पडला. त्यामुळे पोलिसांना शोधमोहीमेत अडचणी येत आहेत. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या मोबाइलमधील पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक आरोपीसह शुक्रवारी गुनाट गावात पोहोचले. आरोपी लपून बसलेल्या शेतामध्ये पोलिसांनी दिवसभर मोबाईल शोधला. मात्र, मोबाईल सापडला नाही. दरम्यान, फरार कालावधीत गाडेला मदत करणारे किंवा ज्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी तो गेला होता, अशा जवळपास सात लोकांचे जबाब पोलिसांनी घेतले; तसेच गाडेच्या घराची देखील झडती घेण्यात आली.

मोबाईल सापडला नाही
गुन्हा केल्यानंतर सर्व प्रथम गाडे कुठे गेला, कसा गेला, तो कुठे कुठे लपून बसला होता. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली का? याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेने गाडे गुनाट गावात लपलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलचा शंभर एकराच्या शेतात दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र, मोबाईल सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी या सहा व्यक्तींचा जबाब नोंदवला.

तरकारीच्या गाडीतून पळ काढला
गुन्हा केल्यानंतर आरोपीला कोणतीही भीती वाटली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गाडेने स्वारगेट परिसरातून एका तरकारीच्या गाडीत बसून सोलापूर रस्त्यावरून त्याने आपलं गाव गाठलं.

Latest Posts

Don't Miss