spot_img
Tuesday, December 3, 2024
spot_img

Latest Posts

राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला, PM Narendra Modi यांची विशेष उपस्थिती

मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर पोस्ट करत शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत दिली आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

५ डिसेंबरला दुपारी १ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे बोलले जात होते. राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ५ डिसेंबरच्या सुमारास नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. नार्वेकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शपथविधीबाबत चर्चा रंगल्या होत्या. नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे.

काय आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट?

Latest Posts

Don't Miss