spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

महाराष्ट्र – कर्नाटक मध्ये तणाव निर्माण; एसटी महामंडळाचा महत्वाचा निर्णय

महाराष्ट्र – कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला केला. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का ? अशी विचारणा करत चालकाला मारहाण देखील केली. या प्रकारणानंतर महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आता महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकात एसटी चालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाले आहे. ठाकरे गटाने मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कर्नाटक बस अडवून आंदोलन करण्यात आला आहे. ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी दहा नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे.

याआधी देखील जोरदार हल्ला

मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये सीमावादाचा प्रश्न आहे. बेळगाव या गावावरून हा सीमावाद आहे. त्यावरून दोन्ही राज्यात हिंसक आंदोलन देखील झाले आहेत. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी याआधी सुद्धा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले आहेत. २०२२ साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार हल्ला केला होता. आता पुन्हा एकदा कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटी आणि चालकावर काळं फासल्याने महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss