ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा २३ नोव्हेंबर रोजी ३८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसाद म्हणून १५ टन लाडू तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी भेट देऊन पाहणी करून उत्सवाची माहिती घेतली. तसेच समितीचा नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन यावेळी संजय केळकर (Sanjay Kelkar) यांच्या हस्ते करण्यात आले. ठाण्यातील वर्तकनगर (Thane) येथील साईमंदिर हे साई भक्तांसाठी प्रति शिर्डीचे स्वरूप आहे. दरवर्षी लाखो भाविक या साई मंदिराला आवर्जून भेट देतात. याच श्री साईबाबा मंदिराचा यंदा ३८ वा वर्धापन दिन असून नागरिकांना प्रसाद म्हणून चक्क १५ टन लाडू तयार करण्यात आले आहेत. तसेच २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर यांनी दिली.
२३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी जवळपास एक लाखाहून जास्त साईभक्त या मंदिराला भेट देऊन आपल्या साईंचे दर्शन घेतील असा अंदाज मंदिर समितीनं व्यक्त केला आहे. यावर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखाहून जास्त असल्यानं त्यांच्या प्रसादासाठी तब्बल १५ टन लाडू बनवण्याचा संकल्प मंदिर समितीनं पूर्ण केला आहे. शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून प्रसाद लाडू वाटप, सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० वाजता यज्ञसमाप्ती पुर्णाहुती त्यानंतर दुपारी २ वाजता साईबाबांच्या पावुकांची भव्य पालखी मिरवणुक इतर कार्यक्रम गायन, भजन व किर्तन अशा भक्तीमय कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
मविआत मोठी बिघाडी; प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसचा युवक नेता आक्रमक
मुख्यमंत्र्यांच्या Thane जिल्ह्याचा कौल कोणाच्या दिशेने ? मतदारांच्या टक्केवारीत झाली वाढ