spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

ठाणे पालिकेतील सफाई खात्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ४५ कामगारांना थकीत वेतन मिळणार…

ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सफाई खात्यात कंत्राटी (Contract in cleaning account) पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे ४५ सफाई कामगारांचे (workers) तीन महिन्यांचे वेतन थकविणाऱ्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सफाई खात्यात कंत्राटी (Contract in cleaning account) पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे ४५ सफाई कामगारांचे (workers) तीन महिन्यांचे वेतन थकविणाऱ्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर कामगारांना दोन थकीत वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम भरल्यानंतर उर्वरित वेतनही देण्याचे प्रशासनाने मान्य केले. भाजपाच्या (BJP) प्रयत्नामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिकेने सफाई खात्यात कंत्राटदाराद्वारे ४५ हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती (appointment) केली आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून वेतन दिले जाते. परंतु तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचारी हवालदील झाले होते. या कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही सरकारकडे जमा केलेली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी (friday) आंदोलनाचा (Protest) पवित्रा घेतला होता. त्यांची महापालिकेकडून दखल घेतली जात नव्हती.

त्याचदरम्यान महापालिका मुख्यालयात पोचलेले भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे (Former BJP group leaders Manohar Dumbre), नारायण पवार (Narayan Pawar) आणि परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील (Transport Committee member Vikas Patil) यांनी कामगारांची व्यथा जाणून घेतली आणि त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त तुषार पवार (Deputy Commissioner of Municipal Corporation Tushar Pawar) यांची कामगारांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घेतली. तातडीने वेतन देण्याबाबत आदेश देण्याची मागणी त्यांनी केली. अखेर या प्रश्नावर उपायुक्त तुषार पवार यांनी मंगळवारी दोन महिन्यांचे वेतन कामगारांना देणार असल्याचे आश्वासन दिले. तर कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरल्यानंतर उर्वरित वेतनही देण्याचे मान्य केले. संबंधित कंत्राटदाराऐवजी येत्या १ सप्टेंबरपासून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटदाराकडे सध्याच्या कर्मचाऱ्यांना वर्ग करण्याचे आश्वासनही उपायुक्त पवार यांनी दिले. या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा: 

Uddhav thackeray यांनी हिंगोलीतून सरकारवर केली जोरदार टीका, शासन आपल्या दारी, थापा मारते…

मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलला आग, ३ ठार, तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss