छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा निर्माण केली होती, तसेच त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘तोरणा’ हा पहिला किल्ला जिंकला होता, त्यानंतर पुढे त्यांनी अनेक किल्ले जिंकले व स्वराज्याची प्रेरणा बळकट केली,असाच एक किल्ला कल्याण शहरात देखील आहे. या किल्ल्याचं नाव आहे ‘दुर्गाडी’ किल्ला. कल्याण शहरातील ऐतिहासिक आणि मानाची वास्तू असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याची माहिती आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. माहाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक जुने व ऐतिहासिक वास्तू आढळतात. त्यापैकीच एक असेलेला दुर्गाडी किल्ला. हा किल्ला ठाणे जिल्यातील कल्याण या शहरात असून कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा भव्य किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम रित्या उभा आहे. मात्र याच इतिहासकालीन शहरातून आता एक धक्कादयक माहिती आता समोर आलेली आहे.
शिवाजी महाराजांच्या काळातील या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बनावट कागद तयार करून दुर्गाडी किल्ल्याची ही जागा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याचे यातून उघडकीस झाले आहे. याप्रकरणी सगळे बनावट कागदपत्र तयार करून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकेड याबाबत निवेदन देण्यात आले होते. यासंबंधी दस्तावेज तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटर व त्या बनावट लेटर वर स्वाक्षरी केलेले दस्तावेज आढळून आल्याने अखेर हे प्रकरण उघडकीस आलं.
तहसीलदार कार्यालयातील प्रीती घोडे यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे . त्यानंतर कल्याण शहरातील महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयश शिर्के हा माळशेज,नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती यादरम्यान समोर आली आहे. कल्याण पोलिस आरोपी सुयश शिर्के याचा कसून शोध घेत आहेत.
हे ही वाचा :
महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आज पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत?
राज कुंद्राचा ‘युटी 69’ प्रेक्षकांच्या भेटीला,कसा आहे सिनेमा वाचा