spot_img
spot_img

Latest Posts

भिवंडीतील धक्कादायक घटना आली समोर, ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि बेदम…

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या किरकोळ वादावरुन एका नराधमानं सात वर्षांच्या मुलीचा (seven-year-old girls) विनयभंग करुन तिला बेदम मारहाण केली आहे.

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या किरकोळ वादावरुन एका नराधमानं सात वर्षांच्या मुलीचा (seven-year-old girls) विनयभंग करुन तिला बेदम मारहाण केली आहे. भिवंडी (Bhiwandi) शहरात ही घटना घडली आहे. अत्याचार करत असताना या चिमुकलीनं आरडाओरडा केल्यानं आसपासच्या नागरिकांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर शेजारच्या नागरिकांनी या नराधमाला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात (Bhiwandi Police Station) पोक्सोसह (POCSO) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. इरफान हसीफ शेख (Irfan Hasif Shaikh) असं या आरोपीचं नाव आहे. या घटनेने भिवंडी शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीचे वडील आणि आरोपी नराधम इरफान हे दोघेही शेजारी राहत आहेत. त्यातच पीडित मुलीच्या पालकांसोबत नराधम शेजाऱ्याशी काही दिवसांपासून शुल्लक कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान पीडित कुटुंबाची मुलगी नवीवस्ती परिसरातील एका खाजगी शाळेत (private school) शिक्षण घेत आहे.

अल्पवयीन शाळकरी मुलगी शुक्रवारी (friday) सायंकाळी घरी परतत असताना नराधमाने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भांडणाचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या पीडित कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा हात एका इमारतीजवळ पकडून तिला ओढले. या घटनेमुळे पीडित मुलीने रडण्यास सुरुवात केल्याने नराधमाने तिला गप्प करण्यासाठी मारहाण करत तिचा चेहरा भिंतीवर आपटले. या मारहाणीत शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दुसरीकडे नागरिकांनी नराधमाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे.

दरम्यान ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी नराधम इरफान यास पकडून त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका करत त्यास बेदम चोप दिला आहे. तर जखमी शाळकरी मुलीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत नराधम इरफानला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भादंवि कलम ३५४,३२४ सह पोक्सो कलम ८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर (Sub-Inspector Bhawar) करत आहेत.

हे ही वाचा: 

‘रमा राघव’ मालिकेच्या रक्षाबंधन स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार आगळावेगळा सोहळा…

माझा आता पर्यंतचा प्रवास कष्टसाध्य होता पण… Shreya Ghoshal

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss